हिंगोली
विशेष
राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा समिती, पळसगांव यांच्या वतीने शनिवार दि ३० जानेवारी सायंकाळी ठीक ०६:३० वाजता “गौरव मातृत्वाचा, सोहळा संस्काराचा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये राजमाता जिजाऊ चरित्र आणि महिला सबलीकरण या विषयावर व्याख्यान होणार असून त्याच सोबत गावातून कला, साहित्य, सामाजिक, क्रीडा, व्यवसाय, शिक्षण आणि शासकीय सेवेत असणाऱ्या व्यक्तींच्या आईचा मानपत्र व सन्माचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी स्वागताध्यक्ष म्हणून शिवमती एस.बी. डाखोरे (ग्रामसेवक, ग्रामपंचायत कार्यालय, पळसगाव), उद्घाटक: शिवमती राजश्रीताई हेमंत पाटील (अध्यक्षा- गोदावरी समूह), प्रमुख मार्गदर्शक: प्रा.डॉ.शारदाताई कदम
!! प्रमुख पाहुणे !!
१) शिवमती. माधुरीताई गोरे (उच्चश्रेणी लघुलेखक महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्रालय, मुंबई)
२)शिवमती. ज्योतिताई कोथळकर (प्रदेश उपाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड, महाराष्ट्र)
३) डॉ. विद्याताई पाटील (जिल्हा अध्यक्ष- जिजाऊ ब्रिगेड, नांदेड)
४) डॉ. भारती मढवई ( प्रदेश प्रवक्त्या- जिजाऊ ब्रिगेड)
५) शिवमती. राजश्रीताई क्षिरसागर (जिल्हा अध्यक्ष- जिजाऊ ब्रिगेड, हिंगोली)
६) शिवमती. नंदिनीताई भालेराव (तालुका अध्यक्ष- जिजाऊ ब्रिगेड, वसमत)
७) शिवमती.मीनाताई दळवी (संचालिका- लिटल किंग्ज इंग्लिश स्कुल, वसमत)
८) डॉ.नंदाताई मोरे ( स्त्रीरोगतज्ज्ञ- आई हॉस्पिटल, वसमत)
९) शिवमती. शिल्पा कोहर ( तलाठी, पळसगावं सज्जा)
हे राहणार असून कार्यक्रमाचे ठिकाण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पळसगांव हे आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा समिती पळसगांव या फेसबुक पेज वरही लाईव्ह दाखवण्यात येईल असे राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा समिती समन्वयक यांच्या कडून सांगण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.