जवळ्यात सावित्री-जिजाऊ विज्ञान महोत्सव – 2020
प्रतिनिधी,
दि.04.01.2020 वार शनिवार रोजी स्वामी विवेकानंद शिक्षण इंग्लिश स्कूल व कन्या विद्यालय आजरसोंडा बाराशिव जवळा बाजार या संस्थेत ” सावित्री-जिजाऊ जन्मोत्सव विज्ञान महोत्सवानिमीत्त ” जिल्हास्तरिय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या महोत्सवात,
वयोगट- 5वी ते 10 वी पर्यंतचे विध्यार्थी सहभागी झाले होते जवळपास 55 ते 60 शाळांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला या स्पर्धेत प्रथम – 5001/- व सन्मान चिन्ह
द्वितीय – 3001/- व सन्मान चिन्ह
तृतीय – 2001/- व सन्मान चिन्ह असे पारितोषिक देण्यात ठेवण्यात आले होते ,
त्यातील पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक वसमत येथील लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल या शाळेने पटकाविले, या शाळेतील विद्यार्थिनी कु, मुयरी गौतम गायकवाड आणि करिष्मा गौतम गायकवाड यांनी ” हायड्रोफोनिक फार्मिंग सिस्टीम शेडनेट हाऊस ” या विषयावर आपला प्रयोग सादर केला होता , शाळेतील विज्ञान शिक्षक अजय डोईजड यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते, द्वितीय क्रमांक कळमनुरी येथील केम्ब्रिज स्कूल ऑफ स्कॉलर या शाळेने तर तृतीय क्रमांक शिवनेरी आश्रम शाळा जवळा बाजार या शाळेने पटकाविले
या विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन व बक्षिस वितरणच्या कार्यक्रमात
मा. आमदार श्री.राजुभैया नवघरे ,आमदार, वसमत विधानसभा संस्थापक डॉ सुभाष बोनडे, व
मा.श्री.अशोक पोफाळकर गतशिक्षणाधिकारी,औंढा नाग
मा.श्री.मुरलीधर कदम केंद्रप्रमुख, जवळा बाजार
मा.श्री.डॉ.संतोष कल्याणकर विभागीय अध्यक्ष मेस्टा
मा.श्री.प्रा.नामदेव दळवी यांची विशेष उपस्थित होती ,
या विज्ञान प्रदर्शनाचे परिक्षक म्हणून
प्रा.श्रीराम सुरवसे प्राध्यापक,शिवाजी महाविद्यालय,परभणी
प्रा.जानकीराम कदम
स्वा.रा.ति.म.वि.नांदेड
प्रा.ए.के.पठान
प्राध्यापक, आदर्श महाविद्यालय,हिंगोली यांनी काम पाहिले