वसमत येथील लिट्ल किंग्ज शाळेचे या वर्षी स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण शाळेतील इयत्ता दहावी चा सोळा वर्षांचा विद्यार्थी सोहम नितीन वाघिले या विद्यार्थ्याच्या हस्ते करण्यात आले . त्याचे कारणही तसेच आहे. वसमत येथील लिट्ल किंग्ज शाळेचा विद्यार्थी सोहम हा इयत्ता नववी मध्ये वर्गातून सर्वाधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे. अत्यंत हुशार, शांत, स्वयंशिस्त असलेल्या या विद्यार्थ्याला शालेय प्रशासनाने एव्हढ्या कमी वयात ध्वजारोहण करण्याची संधी दिल्याने विद्यार्थी पालक आणि सर्व स्तरांमधून सोहम चे कौतुक होत आहे.
शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी आपण शिक्षण घेऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला पाहिजे. शिक्षण घेतांना स्वतःला शिस्त लावली तर भविष्यातील जीवन नक्कीच सुखमय होइल. विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणं हेच ध्येय ठेवले पाहिजे. हिच भुमिका ठेऊन शाळेने सोहम ला हा मान दिला असल्याचे मत शाळेचे संस्थापक प्रा डॉ नामदेव दळवी यांनी व्यक्त केले. यावेळी शालेय विद्यार्थी , पालक शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. प्रसंगी महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करतात आले. यावेळी अत्यंत कमी वेळात शाळेच्या सांस्कृतिक, क्रिडा, परीक्षा, संगीत , शिस्त, स्वच्छ्ता विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आ