लिट्ल कींग्ज शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप.
वसमत
प्रतिनधी,
आई-वडिलांच्या अपेक्षा साठी केवळ डॉक्टर आणि इंजिनिअर च्या स्वप्न बघू नका तर या देशात अशी हजारो क्षेत्रे आहेत ज्या क्षेत्रात तुम्हाला पैसा आणि नावही कमविता येईल भविष्यात ही सर्व क्षेत्रे काबीज करा .इस्त्रोत सायन्टिस , आपल्या आवडीच्या क्षेत्रात कलावंत , गाण्याच्या क्षेत्रात गायक , खेळाच्या क्षेत्रात उत्कृष्ट खेळाडू ,शिक्षणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट शिक्षक , इव्हेंट मॅनेजमेंट इत्यादी क्षेत्रात नावलौकिक करण्याची तुम्हाला संधी आहे म्हणून तुम्ही तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडून त्या क्षेत्रातील रत्न बना , आता काळ बदलला आहे
काळाबरोबर निर्माण होणाऱ्या संधीचा शोध घ्या.
असे आव्हान वसमत येथील उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संबोधित केले .
ते वसमत येथील लिटल किंग्ज शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या चौथ्या बॅचच्या निरोप संभारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक प्रा डॉ नामदेव दळवी तर प्रमुख पाहुणे वसमत शहर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे साहेब , पालक प्रतीनीधी दशरथ मगर शाळेचे मू. अ. गोविंद दळवी उपस्थित होते .
पुढे बोलताना डॉ. सचिन खल्लाळ म्हणाले की आज केवळ आई वडीलाचे स्वप्न डॉक्टर आणि इंजिनिअर होणे एवढेच आहे
पण आता काळ बदलला आहे . आमच्या काळात ज्ञान मिळवायचे असेल तर आम्हाला ग्रंथालय जावे लागत असे हे पुस्तक वाचावे लागत असत आता काळ प्रचंड बदलला आहे तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती गूगल आणि मोबाईल वरती विलीन सेकंदात प्राप्त इंटरनेट सुरू केल्या बरोबर जगभरातले ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं संगणक इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे त्यामुळे जगाच्या तंत्रज्ञाना सोबत तुम्हाला जावे लागेल .मी पण स्वतः एमबीबीएस डॉक्टर असून सुद्धा आज स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एका जिल्ह्याचा उपजिल्हाधिकारी म्हणून काम करतो आहे . तुम्ही केवळ साचेबद्ध विचार करू नका , माझ्या बरोबरचे अनेक मित्र यांचे शालेय जीवनामध्ये मार्क कमी होते असे माझे वर्गमित्र आज आयपीएस क्षेत्रात आपले नाव कमवून आहेत .याचबरोबर विविध क्षेत्रांमध्ये ते स्वतःचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात सिद्ध करत आहेत .
आज जगभरात विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत.
ग्राफिक्स, ॲनिमेशन , नवीन आलेल्या तंत्रज्ञानाला जगभरात प्रचंड मागणी आहे त्या क्षेत्रात करिअर करा. असे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळही पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थी प्रणव बोड्डेवार आणि वेदांत अलोणे या विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक गोविंद दळवी यांनी केले.