मराठवाडा विशेष
लोहा तालुक्यातील सोनखेड येथे एका पाच वर्षे बालिकेचे अपहरण करून अत्याचार केल्याच्या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात व महाराष्ट्रात असंतोष होत असून ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे , म्हणून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात ( जलदगती न्यायालयात ) चालवा आणि याबाबत तात्काळ चार्जशीट दाखल करा अशी मागणी गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे
राजश्री पाटील यांनी पीडित बालिकेचे आणि परिवाराची भेट घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची भावना व्यक्त केली.
जिल्ह्यातील बिलोली आणि किनवट येथे मुलींवर अत्याचाराच्या घटना ताज्या असताना सोनखेड येथे एका पाच वर्षे पालिकेचे 25 फेब्रुवारी रोजी आरोपीने अपहरण करून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आणि जिल्ह्यात असंतोष व्यक्त होऊ लागला त्यामुळे गोदावरी समूहाचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी पीडित बालिकेची रुग्णालयात जाऊन भेट घेतली व सोनखेड येथे बालिकेच्या परिवाराची भेट घेतली यावेळी राजश्री पाटील यांना अश्रू अनावर झाले होते . याप्रसंगी त्या म्हणाल्या की दिवसेंदिवस महिला मुली आणि बालिकेवर अत्याचार वाढत चालले असून न्यायालयीन प्रक्रियेतील विलंबामुळे समाजातील नतद्रष्ट लोकांची हिम्मत असे कृत्य करण्यासाठी वाढत आहे. यावर ठोस पावले उचलून सोनखेड अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शासन करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, अशी मागणी नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्याकडे त्यांनी केली आहे तसेच या प्रकरणातील तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा उमाप यांची भेट घेऊन त्यांनी या प्रकरणातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी तपास करावा अशी विनंती त्यांनी केली आहे .