हिंगोली प्रतिनिधी
हिंगोली जिल्हयातील पोस्टे वसमत शहर हददीत मॉर्निंग वॉक व घरापुढील सडासारवन करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दागिने सलग दोन वेळा हिसकावुन चोरटे पसार झाल्या संदर्भाने पो.स्टे वसमत शहर येथे दोन जबरी चोरीचे गुन्हे दाखल होते. हिंगोली पोलीस अधीक्षक श्री जी. श्रीधर यांनी सदर गुन्हयाचा छडा लावण्याबाबत पोनि स्थागुशा श्री पंडीत कच्छवे यांना सुचना देउन सपोनि शिवसांब घेवारे स्थागुशा यांच्या नेतृत्वात एक विषेश पथक नेमण्यात आले होते.
पोलीस पथकास गोपनिय माहिती मिळाली की वसमत येथील पहाटेच्या दरम्याण मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांच्या गळयातील चैन स्नॅचिंग करणारे आरोपी हे शिवनगर नांदेड परिसरातील आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्या संदर्भाने पोलीस पथकाने सापळारचुन शिवनगर नांदेड येथील संशयीत आरोपी नामे राहुल प्रदिप जाधव वय 22 वर्ष व्य ऑटो चालक रा. शिवनगर नांदेड व एक विधीसंघर्षग्रस्त बालकयास ताब्यात घेउन सदर गुन्हया संदर्भाने विचारपुस केली असता आरोपींने वसमत शहरातील मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांच्या गळयातील सोन्यचे दागीने जबरीने चोरल्याचे कबुल केल्याने चोरलेला सोन्याचा मुददेमाल सोन्याची 35 ग्रॅम वजनाची चैन व 5 ग्रॅम वचनाचे मंगळसुत्र / मिनिगठन कि. 2,40,000/- रू व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल कि.अं 60,000/- व मोबाईल असा एकुन 3 लाखाचा मुददेमाल जप्त केला.
आरोपीची अधीक विचारपुस केली असता आरोपीवर यापुर्वीचे जबरी चोरीचे अनेक गुन्हे असुन हिंगोलीसह, नांदेड, परभणी जिल्यात सुध्दा जबरीचोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री जी. श्रीधर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. श्री. पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे स.पो.नि. शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार शेख बाबर, पांडुरंग राठोड, विठठल कोळेकर, आकाश टापरे, गणेश लेकुळे, नरेंद्र साळवे, तुषार ठाकरे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली यांनी केली. तसेच पो.स्टे शिवाजीनगर, नांदेडचे पोनि मोहन भोसले, पोउपनि सोनकांबळे, पोशि रवीशंकर बामणे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.