शहर वाहतूक नियंत्रण शाखा हिंगोली चा उपक्रम
वसमत,
प्रतिनीधी .
वसमत येथील लिट्ल किंग्ज या इंग्रजी शाळेत हिंगोली जिल्हा पोलीस ,शहर वाहतूक नियंत्रण शाखा हिंगोली आणि वसमत ग्रामीण शहर पोलीस स्टेशनच्या वतीने रहदारीचे नियम आणि अपघात या संदर्भात विद्यार्थ्यांना ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांनी ” रस्ता सुरक्षा पाठशाळा ” या उपक्रमांतर्गत शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या संदर्भात नियम व अटी कशा पाळायच्या ?
या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी दुचाकी चालविताना , सायकल चालविताना ,मोटरसायकल चालविताना कोणते नियम पाळायचे ? वाहतुकीचा परवाना कसा मिळतो ? त्यासाठी वयाची अट काय असते ? वाहतुकीचे नियम मोडल्यास कोणता गुन्हा दाखल होतो ? सजा कशी मिळते . या संदर्भात त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधले .
त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना वाहतूक सजगता मोहीम समजून सांगून या मोहिमेची शपथ सुद्धा विद्यार्थ्यांना घ्यायला लावली.
यावेळी शहर वाहतूक चे पोलीस लक्ष्मण गायकवाड, श्री चव्हान शाळेचे मुख्याध्यापक गोविन्द दळवी, शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी यांची उपस्थीती होती .