आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार सामूहिक आत्मदहन
हिंगोली
प्रतिनीधी ,
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्र शासनाने आर टी . ई . शिक्षण हक्क कायदा अमलात आणला .
त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा आर. टी .इ. पंचवीस टक्के प्रवेंश शासनाच्या नियमानुसार देत आहेत.
शैक्षणिक वर्ष 2012 ,13 पासून या निधी वाटपात सतत अनियमितता दिसून येते आहे.
शैक्षणिक वर्ष २०१८ ~ १९ आणि शैक्षणिक वर्ष २०१९ ~ २० या शैक्षणिक वर्षातील निधी अजूनही संस्थाचालकांच्या शाळा खात्यात जमा झाला नाही . महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्था चालक संघटनेच्या (मेस्टा ) पाठपुराव्यामुळे शासनाने सहाशे कोटीची आवश्यकता असताना केवळ शंभर कोटी निधी वितरणाचे आदेश काढलेले आहेत.
आधीच covid-19 मध्ये सदरील शाळेची परिस्थिती आर्थिक दृष्ट्या ढासळलेली असतानासुद्धा शासन हा हक्काचा पैसा शाळेला वेळेवर देत नाही . प्राथमिक शिक्षक संचालनालय पुणे यांचा हिंगोली जिल्ह्याला प्राप्त निधी ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी वाटप करण्याचे सक्त आदेश असताना सुद्धा हिंगोली जिल्हा परिषद शिक्षण विभागाने मार्च महिना उजाडला तरी तो निधी वाटप केला नाही . याबद्दल हिंगोली जिल्हा संघटनेच्या वतीने वारंवार निवेदने देऊन सुद्धा निधी वाटप केला जात नसल्याने दिनांक २५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील अनेक संस्थाचालकांनी जिल्हाधिकारीआदरणीय जितेन्द्र पापळकर यांना दिनांक २८ फेब्रुवारीपर्यंत निधी वाटप करावा अन्यथा इंग्रजी माध्यम संस्थाचालक आपल्या कार्यालयासमोर पुढे सामूहिक आत्मदहन करतील असा इशारादिला होता . तरी सुद्धा शिक्षण विभाग सतत दुर्लक्ष करीत आहे . त्यामुळे आर्थिक विवंचनेत अडकलेल्या संस्थाचालकांनी दि. ३ मार्च २०२२ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे .
यातून काही अनुचित प्रकार घडला तर या शाळेतील संस्थाचालकांच्या कुटुंबाची जबाबदारी ही संपूर्णपणे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद हिंगोली यांची असेल असे निवेदन महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटना (मेस्टा ) हिंगोली जिल्हा यांनी दिले आहे .