३ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान विविध मैदानी खेळ
हिंगोली
प्रतिनिधी ,
वसमत शहरातील लिटल किंग्स इंग्लिश स्कूल मध्ये मागील 14 वर्षापासून जिजाऊ _ सावित्री क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते असते .
पण या वर्षी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यभर जिजाऊ सावित्री महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे ठरविले असल्याने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शाळेमध्ये 3 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले आहे .
त्यामध्ये तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे शाळेच्या ज्ञाणांगन परिसरात शाळेतील मुलींच्या हस्ते पूजन करण्यात येऊन या क्रीडा महोत्सव सुरु करण्यात आला आहे
या दरम्यानच्या काळात शाळेमध्ये लांब उडी , उंच उडी , संगीत खुर्ची , १०० मीटर धावणे , बॉल बॅडमिंटन , हॉलीबॉल फुटबॉल , चित्रकला , संगीत खुर्ची इत्यादी खेळांचे आयोजन करण्यात आले आहे .
सोबतच शाळेच्या मुक्ताई सभाग्रहात सर्व विद्यार्थ्यांना ” राजमाता जिजाऊ ” हा चित्रपट दाखविला जाणार आहे
शेवटच्या दिवशी आनंद नगरीने आणि 12 जानेवारी रोजी सावित्री-जिजाऊ ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धेने कार्यक्रमाची सांगता होणार आहे .
शाळेमध्ये जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्रातील लेकींचा , प्रेरणा जिजाऊंची वसा सावित्रीचा ” ही थीम घेऊन मागील अनेक वर्षापासून जिजाऊ सावित्री क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते .
या क्रीडा स्पर्धांमुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक गोविंद दळवी संस्थापक प्रा डॉ.नामदेव दळवी यांनी कळविले आहे .