महाराष्ट्र
खबर
देशभरात कोरोनाचा कहर वाढत असतानाच, आता अर्थव्य़वस्थेवरही लक्ष देण गरजेच आहे. त्याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात अनलॉक 5 चे नवीन नियम जाहिर झालेत. महाराष्ट्रात आता नेमके काय बदल होतील याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
राज्य़ सरकारने अनलॉक 5 मध्ये आणखी काही सवलती दिल्यात. नव्या आदेशानुसार राज्यात 5 ऑक्टोंबरपासुन रेस्ट्रॉरंट सुरु करण्याची परवानगी देण्यात आलीय. याशिवाय मुंबईच्या डबेवाल्यांना लोकलमधुन प्रवासाची परवानगीही देण्यात आली आहे. मुंबईच्या लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असुन पुण्याच्या लोकल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
दरम्यान देशात 1 ऑक्टोबरपासुन नवीन नियम लागु होणार आहेत. गॅस, टिव्ही, विमा, पॉलिसी बेकरी पदार्थ ते मोटार वाहन नियमावलीत बदल होणार आहेत. कोरोना काळात देशाची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात खालावलीय. या काळात देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याच दिसुन आलय आशातच सामान्य़ लोकांच्या खिशाला अजुन झळ पोहोचणार असल्यास दिसतय.पुढील महिन्यापासुन देशात काही नियम लागु होणार आहेत जे सामान्याच्या खिशावर थेट परिणाम करतील.
महाराष्ट्रात 1 ऑक्टोंबर पासुन होणारे बदल
- 31 ऑक्टोबर पर्यंत शाळा बंदच
- सिनेमागृह सुरु करण्यातबाबत उद्या निर्णय
- राज्यातील लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरु करण्याबाबतही विचार सुरु
- 5 ऑक्टोबर पासुन रेस्ट्रारंट आणि बार 50 % क्षमतेने सुरु केले जातील.
- लोकलच्या फेऱ्या वाढवल्या जातील.
- मुंबईतील लोकलमध्ये डबेवाल्यांना परवानगी असेल.
- पुण्यातही लोकल सुरु होणार