वसमत
शहर प्रतिनिधी,
हिंगोली जिल्यातील वसमत – अर्धापुर राष्टीय महामार्ग 61(222)येथील जिजाऊ चौक(जिंतूर टी- पॉईंट) या ठिकाणी आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने मराठा समाजाचा सरसकट OBC मध्ये समावेश करण्यात यावा, ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रु मदत घ्यावी, ज्यांना पीक कर्जाचा लाभ अद्याप मिळाला नाही त्यांना तात्काळ लाभ द्यावा, परतीच्या पावसाने हिंगोली जिल्यातील ज्या गावात पाणी शिरले त्या गावतील नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी व राष्ट्रीय महामार्ग 61(222) चे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून संबंधित कंत्राटदारावर योग्य ती कार्यवाही करा इत्यादी मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले
संभाजी ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील महागावकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले .
मुख्य रस्त्यावर हे आंदोलन होत असल्याने येथे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याचे चित्र पहायला मिळत आहे पण; त्यातही रुग्णवाहिका आल्यास आंदोलन कर्त्यांनी त्यांना मार्ग करून देऊन एक सामाजिक सलोखा राखला आहे. मराठा समाजाची केंद्र आणि राज्य सरकारने मिळून घात केला आहे असल्याचे मत आंदोलन कर्त्यांनी व्यक्त केले. त्याच बरोबर शेतकऱ्यांसाठी कोणहीती ठोस उपाय योजना राज्य सरकार करीत नाही.
अश्या प्रकारच्या तीव्र भावना आंदोलन कर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.
यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला होता.यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील जाधव महागावकर, तालुका अध्यक्ष उत्तर- विजय दाढळे, तालुका अध्यक्ष दक्षिण ज्ञानेश्वर माखणे, वसमत विधानसभा अध्यक्ष अलोक इंगोले यासह अनेक कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी वसमत शहर ठाणे पोलीस निरीक्षक बंदखडके यांनी चोख पोलीस बंदोबस्त केला .