पोलीस निरीक्षण सूनील गोपीनवार यांचा गावकऱ्यांच्या वतीने गौरव
वसमत
शहर प्रतिनिधी
वसमत तालुक्यातील मौजे मरसुळ वाडी येथील बौद्ध समाजाच्या समशान भूमीचा वाद मागील काही वर्षापासून असून चालू होता तो पोलीस स्टेशन कुरुंदा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सूनील गोपीनवार साहेब यांच्या पाठपुराव्याने काल दिनांक 24 /09 /2019 रोजी मा. तहसीलदार साहेब वसमत यांनी सदर जागेचा तोडगा काढून मरसुळ वाडी येथील बौद्ध समाजाचे समशान भूमी साठी दोन गुंठे जमीन समशान भूमी चे नावावर करून दिली आहे त्यासंदर्भात मरसुळ वाडी येथील बौद्ध समाजाचे कार्यकर्ते व गावकरी मंडळी यांनी आज पोलीस स्टेशनला येऊन श्री.सुनील गोपीनवार साहेबांचा सत्कार करून आभार व्यक्त केले आहे सदर प्रसंगी पोलीस ठाणे येथील कर्मचारी केंद्रे साहेब, आमले साहेब,वाळके साहेब, भोपे साहेब, दाबनवाड साहेब, पटवे साहेब, हे हजर होते तसेच मरसुळ वाडी येथील गावकरी व कार्यकर्ते श्री दिलीप योगाजी खंदारे, संजय उत्तम खंदारे, राहुल सोनाजी गायकवाड ,धोंडबा मारोती खंदारे, पिंटू सिंगारे ,विजय भुरे, राहुल खंदारे हे हजर होते