संभाजी ब्रिगेडचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
वसमत
शहर प्रतिनिधी,
सन २०२१ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेत एस टी प्रमाणे ओबीसी, व्हिजेएनटी, एसबीसी ,एसीबीसी, मराठा या जातीतील जनगणना करण्यात यावी या प्रमुख मागणी सह विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड च्यावतीने 15 जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले,
प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनात एस एस ती प्रमाणे ओबीसी, व्हीजेयनटी, एस बीसी, एसीबीसी, मराठा जातीप्रवर्गाची स्वतंत्रपणे जनगणना करण्यात यावी, शेतीला उद्योजकाचा दर्जा देऊन शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्यात यावा सातबारा कोरा करून शेतकरी कर्जमुक्त व चिंतामुक्त करण्यात यावा दरवर्षी पेरणीपूर्वी दहा हजाराचे अनुदान देण्यात यावे, मुंबई येथील अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचे स्मारक करण्याऐवजी ते जमिनीवर राजभवनाच्या शासकीय जमिनीवर उभारण्यात यावे, कारण वर्षातील 12 ही महिने ते शिवप्रेमीसाठी खुले राहिल आणि अरबी समुद्रात उभे केल्यास वर्षातील 6 महिने वारा पाऊस आणि समुद्रांच्या लाटांमुळे ते शिवप्रेमीसांटी खुले राहणार नाही त्यामुळे ते जमिनीवरच उभारण्यात यावे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची मुले, आणि आमदार ,खासदार जिल्हा परिषद, पंचायत समिती ग्रामपंचायत या राजकीय पदाधिकाऱ्यांची मुले जिल्हा परिषद किंवा महानगरपालिके च्या शाळेमध्ये कंपल्सरी टाकण्यासाठी कायदा करण्यात यावा ,
छत्रपती शिवरायांची बदनामी करणारे ” आज के शिवाजी नरेंद्र मोदी ” हे पुस्तक तात्काळ बंद करण्यात यावे शिवजयंतीच्या दिवशी बहुजन समाजातील योग्य व्यक्तीला शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रभूषण देण्यात यावा अशा विविध मागण्यांचे निवेदन संभाजी ब्रिगेडचे उपविभागीय अधिकारी कार्यालय मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले, निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील जाधव महागावकर, तालुका अध्यक्ष सुरेश इंगोले ,पाटील ज्ञानेश्वर माखणे, नितीन भोसले ,विजय नारायण खराटे ,मारुती मुळे, शिवराज मुळे ,आकाश खराटे, आलोक इंगोले ,कामाजी कदम ,गोविंद इंगोले ,भगवान कदम ,गजानन पडोळे , किशोर वाळके , प्रसाद व्यवहारे , राजेश व्यवहारे, अमोल अंभोरे , मदन चव्हाण नवनाथ वाघ, श्रीनिवास खंदारे, गजानन दळवी, गजानन इंगोले, गणपत आंभोरे ,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .