वसमत,
शहर प्रतिनिधी,
वसमत येथे दि, 17 डिसेंबर रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यालय वसमत येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातुन 62 शाळांनी आपले प्रयोग दाखल केले होते ,यावेळी प्रथमच वेगवेगळाले विषय देऊन हे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते,
या उदघाटकीय कार्यक्रमास वसमत प स चे गटशिक्षणाधिकारी मा तान्हाजीराव भोसले , विस्तार अधिकारी श्रीमती जाधव, जबडे सर, शाळेचे संस्थापक माजी उपप्राचार्य बी.डी. कदम सर, शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती पतंगे सरिता यांची उपस्थिती होती. या विज्ञान प्रदर्शनामध्ये शाश्वत कृषी पद्धती
,स्वच्छता आणि आरोग्य ,संसाधन व्यवस्थापन ,औद्योगिक विकास ,भविष्यातील परिवहन आणि संचार ,शैक्षणिक खेळ आणि गणितीय प्रतीक या विषयावरील प्रयोगाचे सादरीकरन करण्यात आले.
यामधून लिटल किंग्ज इंग्लिश स्कुलच्या कु ,ग्रीष्मा गायकवाड या विद्यार्थ्यांतीने ” लँडफिल्लिंग ” या अत्याधुनिक संकल्पनेचा वापर करून प्रयोग तयार केला व अतिशय सुंदर सादरीकरण केले.
त्याचबरोबर प्राथमिक गटातून ईशीता देशमुख या विद्यार्थिनीने ” गणितीय खेळ ” या विषयांतर्गत मॅजिक कॅलेंडर तयार केले होते.
ग्रीष्मा गायकवाड या विद्यार्थ्यांच्या प्रयोगाने माध्यमिक गटातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिला शाळेतील विज्ञान शिक्षक अजय डोईजड, शिरपूरकर, संगीता अडकीने या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक गोविंद दळवी , संचालिका मीना इंगोले शिक्षक, कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले आहे ,
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात लिटल किंग्ज द्वितीय.
Leave a comment