श्यामराव रावले यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान
कै. दीनानाथ मंगेशकर माध्यमिक शाळा सातेफळ येथील हिंदी शिक्षक श्यामराव नारायणराव रावले यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार त्यांना रंगशारदा सभागृह,बांद्रा,मुंबई येथे दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने पालकमंत्री मुंबई श्री मंगलप्रसाद लोढा,आमदार श्री कपिल पाटील आणि शालेय शिक्षण सचिव श्री रणजितसिंह देओल, संचालक श्री कृष्णकुमार पाटील,विभागीय उपसंचालक श्री संदीप संगवे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
श्यामराव रावले हे गेल्या 26 वर्षापासून हिंदी विषयाचे अध्यापन करीत आहेत.अध्यापन प्रभावी आहे व हिंदी भाषेत अधिक अंक प्राप्त व्हावे यासाठी हिंदी विषयाचे ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य निर्माण केले, विद्यार्थ्यांना हिंदी परीक्षेत प्रविष्ट करणे-अभ्यासाला प्रवृत्त करणे. यामुळे हिंदी विषयात विद्यार्थ्यांना अधिक अंक प्राप्त झाल्याचे दिसून येते. अध्यापन कार्यासोबतच शैक्षणिक, राष्ट्रीय, सामाजिक,साहित्यिक व राष्ट्रीय कार्यात मोलाचा वाटा आहे. पुनरर्चित पाठ्यक्रम वर्ग 8 वी,9 वी व 10 वी हिंदी विषयासाठी जिल्हा,विभाग व राज्य स्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड व मार्गदर्शन. उत्तरोत्तर कार्याचा आलेख वाढतच गेला.या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ बालभारती पुणे या शासकीय संस्थेत हिंदी अभ्यास गटावर सदस्य व समीक्षक म्हणून नियुक्ती.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे बोर्ड हिंदी विषय तज्ञ व गोपनीय कार्य. ते एक उपक्रमशील शिक्षक असून मागील वर्षी महाराष्ट्र राज्य शिक्षण व संशोधन परिषद पुणे तर्फे आयोजित नवोपक्रम स्पर्धेत माध्यमिक गटातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक तर राज्यात तृतीय क्रमांक प्राप्त तर यावर्षी जिल्ह्यात प्रथम क्रमांक . तसेच लेखन क्षेत्रात भरीव कामगिरी पाच पुस्तके प्रकाशित आहेत तसेच राज्य-राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र व मासिकात लेख प्रकाशित. तसेच जीवन गौरव या शैक्षणिक मासिक चे सहायक संपादक म्हणून कार्य करत आहेत.
उल्लेखनीय कार्य
2018 मध्ये scert पुणे ने बालरक्षक म्हणून नियुक्ती दिली व माझे कार्यक्षेत्र वसमत तालुका निर्धारित केले.बालरक्षक ही संकल्पना शासन आदेश 9 जानेवारी 2017 नुसार आली. श्यामराव रावले सरांनी शाळेच्या कामकाजासोबत शिक्षणापासून वंचित-शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी-शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी कार्य सुरू केले.वसमत शहरातील वीटभट्टी असो की शांतीनगर पालातील वस्ती याठिकाणी सर्वे केला व शैक्षणिक वातावरण निर्मिती करत कार्य सुरू केले. मार्च 2020 मध्ये महाभयंकर बिमारी कोरोना आली अन सर्व काही ठप्प. विद्यार्थ्यांच शिक्षण ही ठप्प. शाळा बंद पण ऑनलाइन शिक्षण सुरू झाले.ज्यांना ऑनलाइन साधन होती ती मुलं शिकत होती पण ज्यांना दोन वेळ जेवणाची सोय नाही तिथे तर वेगळी परिस्थिती. रावले सरांनी ही परिस्थिती ओळखून 10 ऑक्टोबर 2021 ला विमुक्त भटक्या समुदायातील शिक्षणापासून वंचित-शाळाबाह्य मुलांसाठी “पालावर शाळा” सुरू केली. ही शाळा माझी शाळा झाल्या नंतर सायंकाळी 5 ते 6:30 यावेळेत पालावरच भरते. सर्वच मुलं या शाळेत येतात-आनंदाने प्रारंभिक शिक्षण घेतात. जणू त्या शांतीनगर वस्तीतील मुलांचे सरांनी पालकत्व च घेतले.आज ही पालावर ची शाळा सुरू आहे.रावले सर आनंदाने पालावर जाऊन ज्ञानदानाचे कार्य करतात. या शाळेचा फायदा शिक्षणापासून वंचित मुलांना झाला.सरांनी 2021-22 यावर्षी 48 मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले.त्यावेळी शहरातील शाळा बंदच होत्या.आता पालावर ची मुलं शहरातील तीन शाळांमध्ये जात आहेत, शिकू लागली आहेत.
राष्ट्रीय कार्य पल्स पोलिओ अभियानात स्वयंसेवक, रक्तदान,कोरोना लसीकरण, गोवर रुबेला लसीकरण इत्यादी कार्यात सक्रिय सहभागी.
तसेच शाळेत एक विद्यार्थी, एक वृक्ष ही संकल्पना राबविण्यात आल्यामुळे वृक्षारोपण-वृक्षसंवर्धन झाले. पर्यावरणा बद्दल जागरूकता निर्माण झाली.
अशाप्रकारे त्यांनी केलेल्या विविध कामांची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन त्यांची राज्य शिक्षक पुरस्कारासाठी निवड करून त्यांना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्यामराव रावले यांना शासनाचा शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल शाळेचे अध्यक्ष तथा माजी सहकार मंत्री मा.डॉ. जयप्रकाश जी मुंदडा साहेब,
डायट हिंगोली चे प्राचार्य पुटवाड साहेब, माध्यमिक शिक्षणाधिकारी मा.माधव सलगर साहेब,प्राथमिक शिक्षण अधिकारी मा.संदीपकुमार सोनटक्के साहेब,गटशिक्षणाधिकारी
मा.सुभाष सोनटक्के साहेब,शिक्षण विकास मंच मुख्य समन्वयक डॉ. माधव सूर्यवंशी ,अधिव्याख्याता गणेश शिंदे , सुखदेव देठे, सुधाकर गावंडे , नांदेड डायटचे अधिव्याख्याता अभय परिहार ,शिक्षण विस्तार अधिकारी श्री तान्हाजीराव भोसले साहेब, काष्टे साहेब,विषय तज्ञ वाळवंटे , सिनेट सदस्य विक्रम पतंगे, डॉ.अलका पोतदार, डॉ.छाया पाटील,माताचरणमिश्र, सुनील यादव, सुधाकर शिंदे,डॉ. छाया पाटील,डॉ.नामदेवराव दळवी सर, रामदास वाघमारे, मुख्य संपादक, जीवनगौरव मासिक महाराष्ट्र राज्य, काकासाहेब वाळुंजकर,मंजुषा सगरोळीकर, दिलीप धामणे, माधव माधसवाड ,आत्माराम राजेगोरे ,मयुर महाजन, एन. के.रावले, डॉ.बालाजी सगरोळे,डॉ.रवींद्र पाटील,मिथुन रावले, मधुकर चपले,ज्योति कोथळकर मॅडम, उषा नळगिरे , मंगल चरभरे व माझ्या शाळेचे मुख्याध्यापक नाथराव भालेराव सर,योग शिक्षक अरविंद जाधव सर,डॉ.कुंटे सर,गुजराती मॅडम,डाखोरे मॅडम व सर्व मित्र परिवारांनी अभिनंदन केले.