शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घ्यायला अधिकारीच कार्यालयात नसतात.
वसमत
प्रतिनिधी
गेल्या दिड ते दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या विविध समस्या संदर्भात.
वसमत वनपरिक्षेत्र कार्यालयात शेतकरी बांधवांनी वेळीवेळी कार्यालयामध्ये कामानिमित्त ये जा केली.
बर्याच दिवसांपासून वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या कार्यालयामध्ये एकही कर्मचारी हजर दिसत नाहीत किंवा त्यांची भेट सुद्धा होत नसल्यामुळे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्या या शेतकरी बांधवांनी बऱ्याच दिवसापासून मांडलेल्या आहेत.
पण अधिकारीच उपस्थित राहत नाहीत
शेतकऱ्यांच्या समस्येवर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांतर्फे कुठलीही कार्यवाही केलेली नाही.
शेतकरी बांधवांचे वनविभागाच्या बाजूला ज्या काही जमिनी आहेत ते वन्य प्राण्यांकडून नासधुस नेहमी होत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते असते.
मागील एक ते दोन महिन्यांपासून अनेक शेतकऱ्यांचे आपल्याकडे ऑफलाइन ऑनलाईन पद्धतीने आलेले बरेच तक्रार अर्ज अजून देखील आहेत.
परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचे पंचनामे केले नाहीत वा कुठल्याही प्रकारची कार्यवाही त्या तक्रारीवर वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यातर्फे कार्यवाही होत नाही.
यामुळे सतत गैरहजर राहत असलेल्या कारणामुळे शेतकऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित राहत असल्यामुळे.
आपण शासनाचा पगार घेऊन शासनाची दिशाभूल करत आहात असा समज येथील शेतकरी बांधवांचा आहे.
यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने यासंदर्भामध्ये आपले व्हिजिट भेट रजिस्टर दौरा, रजिस्टर आम्हाला लेखी स्वरूपात द्यावेत.
च्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड वसमतचे पदाधिकारी कार्यालयामध्ये गेले असता त्या ठिकाणी कुणीही हजर नव्हते.
त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्यांच्या कार्यालयाच्या दरवाजाला ताळा ठोकण्यात आला आहे.
या वेळी संभाजी ब्रिगेड चे जिल्हा सचिव नारायण खराटे, वसमत तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर माखने, विजय डाढाळे, तालुका प्रसिध्दी प्रमुख अंकुश भेंडेगावकर, राजु पाटील व्यवहारे हे उपस्थित होते