वसमत येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने मागील वीस वर्षा पासून विविध व्याख्याने ,पुरस्कार वितरण , भव्य फटाक्यांची आतिषबाजी आशा स्वरूपात साजरा व्हायचा अशी ही वीस वर्षांची परंपरा आहे
पण यावर्षी कोरोना काळाच्या वाढत्या संक्रमणामुळे सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीने जिल्हा परिषदेच्या मैदानावर तो मोठ्या प्रमाणात साजरा न होता अत्यंत साध्या पद्धतीने छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून संपन्न होणार आहे .
त्यासाठी कोरोना काळातील सर्व नियम पाळून सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे सर्व माजी अध्यक्ष सन्माननीय माजी सदस्य ,सर्व पदाधिकारी आणि शिवप्रेमी बांधवांना विनंती की आपण उपस्थित रहावे
मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या मैदानावर जिल्हा परिषद शाळेच्या दोन्ही बाजूंनी लावलेल्या वटवृक्षाचे दि 19 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 12 वाजता पूजन करून त्याचा ” प्रथम वाढदिवस ” साजरा करून छत्रपती शिवाजी महाराजांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवांजली अर्पण करण्यात येणार आहे
तरी सर्व शिवप्रेमी बांधवांना याची नोंद घ्यावी असे सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीने कळविले आहे