पोलीस स्टेशन व शिवजयंती समितीचा उपक्रम
वसमत
प्रतिनिधी
कुरुंदा येथील पोलीस प्रशासनआणि सार्वजनिक शिवजयंती जन्मोत्सव समिती व कुरुंदा सर्कल मधील सर्व शिवप्रेमी च्या वतीने कुरुंदा पोलीस स्टेशन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले , पोलिस प्रशासनाच्या विनंतीवरून कुरुंदा येथील शिवजयंती सध्या पद्धतीने साजरी करीत , मिरवणूक न काढता भव्य रक्तदान शिबिर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना वेगळ्या पद्धतीने अभिवादन करीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ,
शिवजन्मोत्सव 2019 निमित्त भव्य रक्तदान शिबिर रक्तदान हेच श्रेष्ठदान रक्तदान हेच जीवनदान या कार्यक्रमाला उदघाटक सतीश देशमुख जिल्हा सहायक पोलिस अधीक्षक , श्री डॉक्टर बोथीकर साहेब डॉक्टर देवदत्त दळवी कुरुंदा नगरीचे सरपंच राजेश पाटील इंगोले पोलीस निरीक्षक सुनील सुनील गोपीनवार पोलीस उपनिरीक्षक सविता बोधनकर व कुरुंदा परिसरातील पोलीस पाटील तसेच सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जगन्नाथ इंगोले , संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष सतीश महागावकर , माजी सरपंच दत्तराव इंगोले , मुंजाजी दळवी , डॉ बारे , प्रल्हादराव इंगोले , शेख फारूक , कुरुंदा नगरीतील पत्रकार नामदेव दळवी, बालाजी काळे , शेख इस्माईल , वसमत सी टि न्यूज आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी रामू चव्हाण परिसरातील शिवप्रेमी व कुरूंदा पोलिस स्टेशनचे कर्मचारीमोठ्या संख्येने उपस्थित होते
या कुरुंदा नगरीतील पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण माननीय श्री यतीश देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व रक्तदान शिबिराचे उद्घाटन हे त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कुरुंदा परिसरातील रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी एकच गर्दी केली हा कार्यक्रम सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालला अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला माननीय श्री सतीश देशमुख यांच्या हस्ते शिवजन्मोत्सव समिती चे अध्यक्ष पदाधिकारीआणि पोलीस पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यात आला
या प्रसंगी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या हस्ते पोलीस स्टेशन कुरुंदा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले .
तसेच कुरुंदा परिसरातील सर्व पोलीस पाटलांचा प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ नामदेव दळवी यांनी केले या कार्यक्रमाचे आभार कुरूंदा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार यांनी केले