महात्मा ज्योतीराव फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र तर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय कायदेरत्न नागरी पुरस्कार 2021 हा ॲड. राजेंद्र दळवी, अध्यक्ष, वकील संघ वसमत यांना जाहिर.
वसमत येथील प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ राजेंद्र दळवी यांना आज मान्यवरांच्या उपस्थितीत मिळणार आहे
पुरस्कार प्रदान सोहळा दि. 24 जानेवारी 2021 सकाळी 11.00 वा. राष्ट्रवादी भवन हिंगोली येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान होणार.
महात्मा ज्योतीराव फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्यातर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय कायदेरत्न नागरी पुरस्कार 2021 हा वसमत वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र दळवी यांना जाहिर झाला असून राष्ट्रवादी भवन हिंगोली येथे दि. 24.01.2021 रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गुणगौरव सोहळा पार पडणार आहे. वकील संघ वसमत चे अध्यक्ष ॲड राजेंद्र दळवी हे वकीली व्यवसायासोबत त्यांचा इतरही सामाजिक कार्यात सहभाग असतो याची दखल घेत. त्यांची यावर्षीच्या पुरस्कारा करीता निवड झाल्याने त्यांची सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.