वसमत
प्रतिनिधी,
उद्याचा वैज्ञानिक तयार होऊन आपल्या देशात कृषी क्रांतीऊन, हरित क्रांति आणि वैज्ञानिक क्रांती निर्माण होईल त्यामुळे अशा स्वरूपाचे विज्ञान विज्ञान प्रदर्शन भरवीने आणि ते यशस्वी करून लहान बाल वैज्ञानिकांना संधी देऊन नवसंशोधन घडविणे हा यामागचा आमचा या विज्ञान प्रदर्शनामागचा हेतू असतो , आणि यातूनच उद्याचे वैज्ञानिक तयार होऊन हा देश आर्थिक आणि तांत्रिक सुजलाम-सुफलाम होईल आणि या देशाला नवं क्रांतीची जगात नोंद होईल असे मत हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच पी तुम्मोड यांनी व्यक्त केली ते वसमत येथे लीटल किंग्ज इंग्लिश स्कूल याठिकाणी आयोजित राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद हिंगोली यांच्यावतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बोलत होते
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोली जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती प्रल्हादराव राखोंडे, उदघाटक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ एच पी तुमोड, हिंगोली जी पच्या कृषी सभापती रत्नमाला ताई चव्हाण , वसमत पंचायत समिती सभापती ज्योतीताई धोसे , उपसभापती विजय नरवाडे , हिंगोली डायचे प्राध्यापक गणेश शिंदे गटविकास अधिकारी सुरोसे साहेब , हिंगोली जि प चे माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री पी बी पावसे कळमनूरीचे गटशिक्षणाधिकारी श्री पातळे साहेब, केंद्रप्रमुख वराड सर केंद्रप्रमुख गुणाजी ढोरे सर , केंद्रप्रमुख रामराव जाधव , केंद्रप्रमुख लांडगु सर, केंद्रप्रमुख गंगाधर होडगिर , संजीवनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रभाकर दळवी , कुरुंदा गावच्या प्रथम नागरिक सरपंच डॉक्टर प्रीती दळवी लीटल किंग शाळेचे मुख्याध्यापक गोविंद दळवी , शाळेच्या संचालिका मीनाताई इंगो ,
इत्यादी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी उपसभापती विजय नरवाडे बोलताना म्हणाले की वसमत शहरातील अत्यंत नियोजनपूर्वक आणि शिस्तबद्ध पद्धतीने वाढणारी शाळा म्हणजे लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल असून भविष्यात या शाळेतून बालवैज्ञानिक घडतील आणि या देशाचे नक्कीच वैज्ञानिक नेतृत्व करतील कारण या शाळेतील प्रत्येक गोष्ट अत्यंत नियोजनपूर्वक विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या जाते असे मत त्यांनी व्यक्त केली
या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमात बोलताना हिंगोली जिल्हा परिषद कृषी सभापती रत्नमाला ताई चव्हाण बोलताना म्हणाल्या की अशा स्वरूपाच्या विज्ञान प्रदर्शनशात नातून निश्चितच उद्याची क्रांती तयार होऊन आजचे बालवैज्ञानिक उद्याचे संशोधक वैज्ञानिक बनतील असे त्या म्हणाल्या ,
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सभापती प्रल्हादराव राखोंडे बोलताना म्हणाले की देशाला मिळालेले डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अतिउच्च शिखरावर भारताला नेऊन ठेवतात त्यांचाच आदर्श घेऊन आमच्या वसमत शहरातील लीटल किंग इंग्लिश स्कूल मार्गक्रमण करीत असल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे असे गौरवोद्गार त्यांनी व्यक्त केले
या विज्ञान प्रदर्शनाचे प्रास्ताविक वसमत गटशिक्षणाधिकारी तानाजीराव भोसले यांनी केले तर सूत्रसंचालन शाळेतील सहशिक्षक सइम पिराजी आणि आभार प्रदर्शन लीटल किंग्ज चे संस्थापक प्रा, नामदेव दळवी यांनी केले
उद्याचे वैज्ञानिक निर्माण व्हावेत हीच आमची भुमिका –डॉ तुम्मोड
Leave a comment