वसमत…..
प्रमाणभाषा हि औपचारिक असते ती शासकिय व्यवहाराला लागतेही मात्र बोलीभाषा अस्सल आणि रसरसीत असते आणि ती माणसा माणसातील अंतर कमी करते.खरे तर आत्म शोधाची वाट हि भाषेच्या गावावरुन जात असते असे प्रतिपादन डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले.ते तेलगाव ता.वसमत येथे आयोजित केलेल्या बोलीभाषा कार्यशाळेच्यासमारोप कार्यक्रमात बोलत होते.
प्रशिद्द कवी डॉ. केशव खटींग यांनी,’मराठवाडी बोली बोलु कवतुके’या नावाने व्हाटस अप ग्रुप चालु करुन मराठवाड्यातील आठही जिल्हयातील बोलीभाषा प्रेमी शेतकरी, शिक्षक,तलाठी,ग्रामसेवक,डॉक्टर अशा सर्व क्षेत्रातील लोकांना सहभागी करुन मराठवाडी बोलीभाषा संकलन आणि संवर्धन करण्याचे काम हाती घेतले आहे.या ग्रुपमधील सदष्यांची दोन कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती.पहिल्या दिवशी दिनांक १७रोजी, वसमत येथील लिटल किग्स शाळेत, या कार्यशाळेचे उद्घाटन शिक्षण विभागाचे अव्वर सचिव ,प्रविण मु्ंडे यांनी आनलाईन पध्दतीने केले.यावेळी मंचावर हणुमंत खवले ,प्रशांत शिंदे, यलाप्पा मिटकर हे उपस्थित होते, दिवसभर कार्यशाळेत शंभर पेक्षा अधिक लोकसहभागी झाले होते.
दुसऱ्या दिवशी उद्घाटन सत्रात अध्यक्ष म्हणून डॉ. संतोष बोंढारे, प्रमुख पाहुणे म्हणून बाजारसमिती वसमत चे प्रशासक तान्हाजी बेंडे,पत्रकार माणिक रासवे ,बालासाहेब काळे व मान्यवर उपस्थित होते.
दिवसभर कथाकथन,कविसंमेलन व चर्चासत्र झाले.
समारोपीय कार्यक्रमाला जवळाबाजार बाजार समितीचे सभापती अंकुश आहेर, उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तान्हाजी भोसले ,पं.स.सदष्य पंढरीनाथ क्षिरसागर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे हेतू कथन डॉ. केशव खटींग यांनी तर, सुत्रसंचलन पांडुरंग बोराडे, शिवदास पोटे यांनी केले.
कार्यक्रम बालाजी राऊत यांच्या कृषी पर्यटन केंद्र तेलगाव येथे संपन्न झाला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी राऊत, प्रा डॉ नामदेव दळवी, ऍड राजा कदम,विलास जाधव,शिवाजी सुर्यवंशी, अण्णा जगताप आणि बोली सदष्यांनी प्रयत्न केले.